नेवासा – नेवासा तालुक्यातील सुरेशनगर- हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर येथे अजाणबाहू योगीराज श्री प्रल्हादगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा सोहळयाची त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोमवारी दि.१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज म्हणाले की जगायचे कस हे संत ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीतून शिकवलं तर कस मरावं हे श्रीमद भागवत कथा आपल्याला शिकवते असा संदेश देऊन त्यांनी भागवत कथा सर्वांनी योगदान देत श्रवण केली व यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला त्याबद्दल त्यांनी योगदान देणाऱ्यांना धन्यवाद देत आभार मानले.
झालेल्या काल्याच्या कीर्तनात बोलतांना ते पुढे म्हणाले की वृंदावनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेला काला पंढरपूरात संत नामदेव महाराजांनी केला,आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी तर देहू येथे संत तुकोबारायांनी काला केला,काला अनेकांना दुर्लभ असा आहे संत संगतीत राहूनच काल्याच्या आनंद भूतलावर मनुष्य जीवाला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जीवनात आलेल्या दुःखातून बाहेर निघण्याकरता जीवनात हरि किर्तन श्रवण करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी भागवत कथेत गायनाची सेवा देणारे गायनाचार्य हभप लक्ष्मण महाराज नांगरे,गायनाचार्य हभप सचिन महाराज पवार,हरि महाराज भोगे,योगेश महाराज शेजूळ,उमेश महाराज,संतसेवक लक्ष्मीनारायण जोंधळे,तालुक्याचे युवा नेते उदयनदादा गडाख,संतसेवक बदाम महाराज पठाडे, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,हंडीनिमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव,सुरेशराव उभेदळ, अण्णासाहेब जावळे,युवा उद्योजक अमृत गडाख यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सात दिवस चाललेल्या श्रीमद भागवत कथेमध्ये काल्याची पंगत देणारे अन्नदाते विठ्ठलराव उंदरे,सुभाष माकोणे,के. सी. पटेल,जनार्धन पटारे, विठ्ठल पाषाण,बाळासाहेब अंबिलवादे,बाळासाहेब साळुंके,हर्षद पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन कथा सोहळयाची सांगता करण्यात आली.
अजाणबाहू ब्रम्हलिन योगीराज प्रल्हादगिरीजी महाराज यांची पुण्यतिथी राखी पौर्णिमेला असल्याने पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात महंत रमेशानंद गिरीजी महाराजांच्या हस्ते समाधीस अभिषेक घालण्यात आला.पुण्यतिथीच्या निमित्ताने दिवसभर हजारो भाविकांनी त्रिवेणीश्वर महादेवासह योगीराज प्रल्हादगिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.