ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पीक

नेवासा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विविध अनुदानासाठी ई- पीक पाहणी करणे गरजेचे आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर दि. १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी केले आहे.

तहसीलदार डॉ. बिरादार यांनी म्हटले की, तालुक्यात एकूण १२७ गावे असून, राज्य सरकारच्या आदेशानुसार दि. १ ऑगस्टपासून खरीप हंगामाकरिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई-पीक पाहणी नोंद सुरू करण्यात आली आहे.सरकारकडून पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर केल्यास ते वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांचे पीक पेऱ्याची नोंद पीक पाहणी अॅपद्वारे करणे गरजेचे आहे.

पीक

ज्या शेतकऱ्यांची ई- पीक पाहणी नोंद झालेली नसेल, त्यांना अनुदानाकरिता अडचणी येणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक पेराची नोंद दि. १५ सप्टेंबरपर्यंत करून घ्यावी. या कामी अडचणी उद्भवल्यास तलाठी, कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, मंडलाधिकारी (महसूल), तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. बिरादार यांनी केले आहे.

newasa news online
पीक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पीक
पीक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पीक