ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आगार

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव बस स्थानक आगार प्रमुखाच्या आशीर्वादाने सध्या अवैध वाहतुकीचे आगार बनले आहे. नगर ते संभाजी नगर महामार्गावर मार्केटचा मोठा वारसा लाभलेले घोडेगाव हे गाव या ठिकाणी असणारा जगप्रसिद्ध जनावरांचा बाजार त्याचप्रमाणे कांदा मार्केट देखील प्रसिद्ध आहे.त्यामुळे या ठिकाणी ये जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी असते. बस स्थानक परिसरात बस ऐवजी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी , फळ विक्रेते यांनी सध्या आपले बस्तान बसवले आहे. या ठिकाणी असणारा आगार प्रमुख हे कधीतरी आपल्या वेळेनुसार महिन्यातुन एखाद्या दोन वेळेस हजर असतात.

आगार

त्यांचे समोर हे रिक्षा व टॅक्सी चालक आपल्या गाडीत प्रवासी बसवण्याचे काम करत असतात. या मुळे या ठिकाणी असणारा अधिक्रृत बस थांबा असूनही बस उभी करण्याकरिता जागा राहत नसल्याने त्या ठिकाणी बस उभी राहत नाही. पर्यायाने प्रवाशांना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अवैध प्रवासी वाहतूकीचा आसरा घ्यावा लागत आहे. या ठिकाणच्या अधिकाऱ्याच्याच आशीर्वादाने हे सर्व काही चालते असे म्हणले तर काही वावगे ठरणार नाही. परंतु एसटी महामंडळाचा होणारा तोटा याचे काय याला कारणीभुत कोण? असा प्रश्न भेडसावत आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आगार प्रमुखावर कारवाई करुन महामंडळाचा होणारा तोटा भरुन काढावा अशी मागणी होत आहे.

आगार
आगार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आगार
आगार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आगार