कडा कॉलनी परिसराला व येथील भूमीला पुण्यकर्माची ओढ-महंत उध्दवजी महाराज मंडलिक
नेवासा – नेवासाफाटा जवळील कडा कॉलनी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महादेव व दत्त मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या निमित्ताने सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य हभप श्री उध्दवजी महाराज मंडलिक यांनी भेट दिली.कडा कॉलनी परिसरात याअगोदर अध्यात्मिक कार्य झाले आहे त्यामुळे येथील भूमीला पुण्यकर्माची ओढ असल्यानेच येथे धार्मिक कार्यात भर पडली असल्याचे गौरवोदगार हभप उध्दवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना काढले. यावेळी हभप उध्दवजी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या दत्त मूर्ती,गणपती मूर्ती,महादेव,नंदी, विठ्ठल रुख्मिणी मूर्तीची राशी वाहून पूजा करण्यात आली
उपस्थित भाविकांसह जीर्णोद्धार कमिटीच्या वतीने हभप उध्दवजी महाराज मंडलिक यांचे संतपूजन करण्यात आले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने येथे त्रिदिनात्मक धार्मिक सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत मुख्य यजमानांच्या हस्ते होम हवनाची विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना हभप उध्दवजी महाराज मंडलिक म्हणाले की कॉलनी परिसरात रहाणाऱ्या भाविकांनी एकत्रित येऊन सकल देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा धार्मिक सोहळयाचे आयोजन केले आहे,श्रावण मासात हा उत्सव होत आहे,येथील भूमीला पुण्यकर्माची ओढ आहे म्हणून परमात्मा हे कार्य करून घेत आहे,आपण केलेल्या पुण्य कर्माच्या सेवेचे फळ हे सर्वांना प्राप्त होत राहील असा शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
यावेळी दिलेल्या भेटी प्रसंगी होम हवनास बसलेल्या यजमानांसह जीर्णोद्धार कमिटी सदस्य,भक्त मंडळ सेवेकरी उपस्थित होते.शुक्रवारी दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महादेव व दत्त मंदिरात बसविण्यात येणाऱ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नेवासा येथील मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार असून
सायंकाळी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या किर्तनाने प्राणप्रतिष्ठा सोहळयाची सांगता होणार आहे.भाविकांनी प्राणप्रतिष्ठा निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.