जेल भरो व रास्तारोको आंदोलन करण्याचा ईशारा
नेवासा – नेवासा तालुक्यातील (मुकींदपूर) नेवासाफाटा,सुरेशनगर,हंडीनिमगाव या परिसराचा विज पुरवठा नेवासा सबस्टेशनला जोडा याबाबत वरील तिन्ही ही ग्रामपंचायतने ठराव करून नेवासा उपविभागीय अभियंता यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे,मागणीची दखल घ्या अन्यथा नेवासाफाटा येथे शुक्रवार दि.२३ ऑगस्ट रोजी रास्तारोको व जेलभरो आंदोलन करु असा ईशारा निवेदनात देण्यात आला आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीच्या अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सुरेशनगर, नेवासाफाटा, हंडीनिमगाव येथील संयुक्तपणे काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की वरील गावांचा विजपुरवठा अत्यंत विस्कळीत झालेला असून एकही दिवस व रात्र विज पुरवठा सुरळीत होत नाही. वायरमन व संबधीत विभागाचे अधिकारी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधुन विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत कळवूनही अनेक महिन्यापासुन विज पुरवठा सुरळीत मिळत नाही. व अधिकारी व वायरमन उडवा-उडवीचे उत्तरे देतात.
सुरेशनगर,नेवासाफाटा( मुकींदपूर)हंडीनिमगाव परिसराचा विद्युत पुरवठा भानसहिवरा सबस्टेशनला जोडलेला आहे. तरी तो विज पुरवठा नेवासा सबस्टेशन मार्फत तात्काळ जोडण्यात यावा अन्यथा दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. नेवासा फाटा येथे गावकऱ्यांच्या वतीने रस्तारोको आंदोलन व जलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. पुढील होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी आपणावर राहील यांची दखल घ्यावी असे ही निवेदनात स्पष्ट केले आहे.
सदर निवेदनावर सुरेशनगरचे,हंडीनिमगाव,मुकींदपूर नेवासाफाटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या सहया आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.