नेवासा : मोबाईलवर स्टेटस टाकतो काय? असे म्हणून मारहाण केल्याप्रकरणी एकाजणाविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी ही घटना घडली. शहरातील मध्यमेश्वरनगर उपनगरातील रवींद्र अशोक जाधव याने तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (दि. २१) दुपारी १.४५ वा. च्या सुमारास शहरातील गणपती चौकात मोटरसायकलवर (एमएच १७ सीटी ३००२) उभा असताना गावातीलच शरीफ पठाण ऊर्फ गोट्या याने केळी गाडीवरील कॅरेटने डोक्यावर मारल्याने बेशुद्ध पडलो. या वेळी गोट्या याने शिवीगाळ करून तू लई माजला आहे. तुला जिवंत मारू, स्टेटस टाकतो काय? असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या वेळी नरेंद्र पिटेकर याने मध्यस्थी करून उपचारासाठी नेवासा फाट्यावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.