नेवासा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेचा अहमदनगर जिल्ह्यासाठीचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा ‘उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.नवनाथ आगळे यांना ‘उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महाविद्यालयाने गेल्या दोन वर्षांत जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले असल्याने विद्यापीठाच्या नामांकित पुरस्कारासाठी महाविद्यालयाची निवड झाली आहे. स्वच्छता अभियान, मतदार जागृती, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षाविषयक कायदे, योगा प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारखे उपक्रम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविले गेले आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा अधिकारी व सहाय्यक तसेच विद्यार्थी यांचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
“श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय हे शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या जाणीवा प्रगल्भ करणारे जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय आहे.”
– उदयन गडाख (उपाध्यक्ष, मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई)
“विद्यार्थी शिक्षणाबरोबरच सामाजिक प्रगल्भतेचा व्हावा, त्याला सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हावी व तो राष्ट्राचा सक्षम नागरिक व्हावा ही भूमिका ठेवून महाविद्यालय वाटचाल करत आहे.”
– प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.