नेवाशात आम आदमी पक्षाचा महावितरणला इशारा, गलथानपणाचा आरोप
नेवासा – महावितरण प्रशासनाच्या गलथान, भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यात वीज वितरणाचा फज्जा उडाल्याचा आरोप आम आदमी पार्टीन केला. पंधरा दिवसांत यात कायमस्वरूपी सुधारणा न झाल्यास घंटानाद, धरणे व वीज बीलावर बहिष्कार आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यासंदर्भात नेवासा आम आदमी पार्टीने महावितरणच्या नेवासे आणि घोडेगाव उपविभागीय अभियंत्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्याच्या सर्वच भागांत वीज वितरणाचा फज्जा उडाला.
तालुक्याला अनियमित तसेच वारंवार खंडित होणाऱ्या विजेची समस्या भेडसावत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने महावितरणच्या घरगुती ग्राहकांसह विविध व्यावसायिक तसेच कृषी ग्राहक त्रस्त झाले. रात्रंदिवस सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे सामान्य ग्राहकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने पिकांना विहीर, बोअरमधून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली. परंतु विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
पंधरा दिवसांत तालुक्यातील वीज वितरण यंत्रणा सक्षम होऊन लपंडाव न थांबल्यास ९ सप्टेंबर २०२४ पासून आम्ही तालुक्यातील वीज ग्राहकांना वीज बिलावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणार आहोत. नेवासे आणि घोडेगाव या दोन्ही उपविभागीय कार्यालयात घंटानाद, बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा नेवासे आप च्या वतीने देण्यात आला. महावितरणचे नेवासे उपविभागीय अभियंता राहुल बडवे यांना आपचे तालुकाध्यक्ष अॅड. सादिक शिलेदार, सचिव प्रवीण तिरोडकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब लोंढे, देवराम सरोदे, मुन्ना आतार, विठ्ठल चांडे, सुमित पटारे, भाऊसाहेब बेल्हेकर, नेवासे शहराध्यक्ष संदीप आलवणे, विठ्ठल मैदाड, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, करीम सय्यद, संघटक किरण भालेराव, संजय साळवे, आदींनी निवेदन दिले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.