जास्तीत जास्त पात्र नागरीकांनी या योजनेचा लाभ घ्यावा – तहसीलदार
पाचेगाव – मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याबाबत राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देण्याबाबतच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी नंतर पाचेगाव ग्रामपंचायत मध्ये सदर कॅम्प आयोजित करून या योजनेचा गावातील नागरिकांचे विविध नमुन्यातील फॉर्म भरण्याचे कॅम्पला काल दुपारी नेवासा तहसीलदार संजय बिरादार,गटविकास अधिकारी संजय लखवाल, रवींद्र शेळके उप मुख्य कार्यकरी,जिल्हा परिषद,पंचायत समिती कृषी अधिकारी श्री कासार यांनी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याकरिता आपल्या राज्य शासनाच्या मान्यतेने सहमतीने अ ३१ डिसेबर २०२३ रोजी ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी शारिरीक अक्षमतेनुसार सहाय्य साधने/उपकरणे पुरविण्याची वयोश्री योजना सुरु केली आहे.
लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतता/दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टीक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबा बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पोर्टल कार्यान्वीत होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीची वितरण पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एकवेळ एकरकमी रक्कम रुपये (३०००/- तीन हजार) शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे असून जास्तीत जास्त योजनेत सहभागी पात्र नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार संजय बिरादार यांनी केले.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड / मतदान कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
पात्र झालेल्या लाभार्थ्यांकरिता DBT Portel द्वारे डायरेक्ट लाभार्थ्याच्या दिलेल्या बँक खात्यामध्ये रु. रक्कम प्रति लाभार्थी (३०००/- तीन हजार) प्रमाणे जमा होतील.
तरी गावातील ६५ वर्षे वयाचे पुढील वय असणाऱ्या नागरिकांनी आपले अर्ज ग्रामपंचायत कार्यलायत जमा करावेत.
या योजने साठी आरोग्य आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग यांनी परिश्रम घेतले.पाचेगाव मतदार यादीनुसार ६५ वर्षावरील गावात ६९२ पुरुष,महिला वर्ग आहे,त्यात काल चार वाजेपर्यंत ११२ नागरिकांचे फॉर्म घेण्यात आले आहे.उर्वरित नागरिकांनी लवकरात लवकर ग्रामपंचायत मध्ये फॉर्म जमा करण्याचे आवाहन सरपंच वामनराव तुवर यांनी केले आहे.यावेळी अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे,मा सरपंच दिगंबर नांदे,मा उपसरपंच दत्तात्रय पाटील,नारायण नांदे,धर्मा बर्डे,ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहूरवाघ, कामगार तलाठी राहुल साठे यांच्या सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.