नेवासा फाटा – श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान ट्रस्ट वडुले बुद्रुक येथे श्रावण महिन्याची चौथी अन्नदानाची पंगत श्री, संभाजी शेटिबा कुसळकर (पोलीस हे. कॉन्स्टेबल) यांचे वतीने भक्तांना देण्यात आली. वडुले बुद्रुक सह तालुक्यातील खेड्यापाड्यातून हजारो महादेव भक्तांनी संगमेश्वराचे दर्शन घेतले व सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच चौथा सोमवारचे औचित्य साधून ह,भ,प श्री दत्तात्रय राजळे महाराज यांचे किर्तिन गोकुल अष्टमी दिवशी झाले. जोहरापूर,वडुले बु।।येथील सर्वे भजंनी मंडळी यावेळी उपस्थित होते संभाजी कुसळकर (दादा)यांचा महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले वडुले बु।।गावचे सरपंच सौ अलका ताई सागडे ,भिमराज काका सागडे व उपसरपंच श्री संजय भाऊ पांडव हे उपस्थित होते,
श्री संगमेश्वर महादेव टेकडी देवस्थान च्या अध्यक्षा सौ .मनीषा अमोल बुचकूल व देवस्थानच्या सचिव श्रीमती विमलताई बुचकुल यांनी संगमेश्वर देवस्थान विकास नियोजन समिति चे अध्यक्ष वडुले ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री संजय भाऊ पांडव व सद्स्य, संगमेश्वर देवस्थान भजनी मंडळ यांचे कार्यक्रम झाले तसेच . श्री संभाजी कुसळकर अन्नदाते यांचे,सहपरिवार यांचा संगमेश्वराची फोटो फ्रेम देऊंन सन्मान केला त्यावेळी देवस्थान च्या अध्यक्षा सौ मनिषा बुचकूल सचिव विमलताई बुचकूल,श्री गोरक्षनाथ कबाड्डी, ज्ञानेश्वर महाराज सबलस , ज्ञानेश्वर महाराज हरवणे,हरि हरवणे महाराज, संजय हरवणे,अशोक सोल्हाट,महेश बुचकूल,अमोल बुचकुल आणि सर्वे सेवेकरी,यांनी आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.