सण उत्सवाच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शन घडवा- तहसीलदार डॉ.संजय बिरादार
नेवासा – गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पंचायत समितीच्या सभागृहात शांतता कमिटीची बैठक महत्वपूर्ण चर्चेने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.सण उत्सवाच्या माध्यमातून जातीय सलोखा वृद्धिंगत करून एकात्मतेचे दर्शन घडवा असे आवाहन तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांनी यावेळी बोलतांना केले. नेवासा येथील पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी दि.३० ऑगस्ट रोजी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ.संजय बिरादार हे होते. प्रशिक्षनार्थी उपजिल्हाधिकारी विशाल यादव,नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे,कार्यालयीन अधीक्षक मेजर रामदास म्हस्के,वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता वैभव कानडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोलट,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूरभाई बागवान, जनसेवक राजेंद्र मापारी,पोलीस स्टेशनच्या गोपनीय शाखेचे प्रमुख अवि वैद्य यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी शांतता कमिटीच्या बैठकीस आलेल्या सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी,सर्वधर्मीय नागरिक यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण उत्सव उत्साहात साजरा करा,उत्सव साजरे करतांना बेशिस्तीचे वर्तन करू नका,शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा ईशारा त्यांनी यावेळी बोलतांना दिला.नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे व कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के यांनी युवकांनी विचारलेल्या स्वच्छता व मोकाट जनावरांचा होणारा त्रास याकडे नगरपंचायत काय उपाययोजना करणार असा सवाल करत धारेवर धरले असता आम्ही आलेल्या तक्रारी नुसार कारवाई करू असे आश्वासन यावेळी बोलतांना दिले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गफूरभाई बागवान, समाजसेवक संजय सुखदान,स्वप्नील मापारी, हारुणभाई जहागिरदार, अजितसिंह नरुला,किशोर बोरकर,निरंजन डहाळे,जयदीप जामदार,कृष्णा डहाळे, राजेंद्र कडु,गफुर बागवान,मयूर वाखुरे,आकाश एरंडे, शुभम उपाध्ये आदींनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या.त्या दृष्टीने देखील कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.सदर प्रसंगी पाचेगाव येथील खुनाचा तपास जलदगतीने लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच नेवासा नगरपंचायतची मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल सोनाली म्हात्रे यांचा यावेळी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना तहसीलदार डॉ.बिरादार म्हणाले की सर्व येणारे सण उत्सव हे एकोप्याने साजरे करावेत जेणेकरून राष्ट्रीय ऐक्य व जातीय सलोखा वृद्धिंगत होईल त्यानुसार हे सण उत्सव साजरे करून एकात्मतेचे दर्शन घडवा,चांगल्या मंडळांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिके देण्यासाठी विचारविनिमय केला जाईल अशी ग्वाही देत त्यांनी येणाऱ्या उत्सवासाठी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
शांतता कमिटीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अंजूम पटेल,सार्थक परदेशी,संतोष गव्हाणे,ॲड.जावेद इनामदार शिवा राजगीरे,आण्णासाहेब जाधव,मंगेश दुधे, सुनील धोत्रे, विशाल धोंगडे, उमेश ठाणगे ,शुभम पवार, आकाश गायकवाड, परवेज पठाण, मनोज हापसे, अंकुश इटकर, दिपक धोत्रे,भारत बोडखे यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.