नेवासा – तालुक्यातील भालगाव येथे लक्ष्मी माता मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे केली आहे याबाबत सतीश खंडागळे यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या अर्जात म्हटले आहे की भालगाव येथे लक्ष्मीमाता मंदीराची नोंद असून त्या जागेबाबतचा उतारा मिळावा मात्र यावर ग्रामपंचायतीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की भालगाव येथील नमुना ८ तपासला असता लक्ष्मी माता मंदिर या नावाची कुठली नोंद येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमीका घेत जागेची मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचे सांगितले आहे याबाबत दिलेल्या अर्जावर बाबासाहेब भागवत,पोलीस पाटील बाळकृष्ण भागवत,गणेश तनपुरे, बाबासाहेब खंडागळे,गणेश पटारे, अशोक तनपुरे, विजय खरात,युवराज तनपुरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.