नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी त्यांचे सहकारी जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे यांच्यासह नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना प्रत्यक्ष भेटून नेवासा तालुक्यातील रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले आहे.नेवासा तालुक्यातील रोड रोमिओंचा बंदोबस्त न केल्यास नेवासा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करू असा ईशारा निवेदनात दिला आहे. निवेदनात शाळा महाविद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना रस्त्याने जाणाऱ्या तरुण मुलींना दुचाकी वाहनावरून येणारी रोड रोमिओंकडून त्रास दिला जातो आहे हे रोड रोमिओ तालुक्यातील शाळा महाविद्यालयात परिसरामध्ये शाळेच्या वेळेमध्ये गिरट्या घालत बुलेट सारख्या किंवा इतर विना क्रमांक वाहनातून सायलेन्सर मधून मोठ्या आवाजात फटाका फोडण्यासारखा मोठा आवाज काढतात आणि रस्त्यावरच घोळका करून थांबतात रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणींना आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना त्रास देत आहेत.
यातून तरुणींची छेड काढण्याचे प्रकार समोर येत आहेत तसेच महाविद्यालयीन परिसरामध्ये अवैध गुटखा विक्री राजरोसपणे जोरात सुरू आहे अल्पवयीन मुलं जोरात वाहने चालवतात रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील त्याचा त्रास होतोय काही नागरिकांनी आणि शिक्षकांनी रोड रोमियोंना जाब विचारला असता त्यांनाच मारहाण किंवा दमबाजी केली जात आहे तसेच महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या रहिवासी वसाहती सोसायट्यांमध्ये रोड रोमिओ जोरात वाहने पळवताना दिसत आहेत यातून अनेक अपघात घडण्याचे प्रकार समोर आले आहे.
अशा प्रकारच्या लेखी तक्रारी प्रहार पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी वेळोवेळी नेवासा पोलीस स्टेशनला दिल्या होत्या अद्याप ठोस अशी काहीच कारवाई न झाल्याने ५ सप्टेंबर पूर्वी नेवासा पोलिसांनी ठोस अशी कारवाई न केल्यास ५ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थिनी आणि पाल्यांसह ठिय्या आंदोलन करणार आहेत याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.