ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रक्षाताई

नेवासा – नेवासा येथील दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रीय क्रीडा व युवा कल्याणमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नेवासा येथील भाजप राष्ट्रीय परिषदेचे सदस्य जेष्ठ नेते दिनकरराव ताके पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जेष्ठ नेते दिनकरराव ताके पाटील यांच्या नेवासा येथील निवासस्थानी दिलेल्या भेटी प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील,भाजपचे युवा नेते मनोजअण्णा पारखे,प्रतीक शेजूळ,भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा भारतीताई बेद्रे,शहराध्यक्ष रोहित पवार उपस्थित होते.

रक्षाताई

यावेळी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते दिनकरराव ताके पाटील यांचे सुपुत्र अशोकराव ताके यांच्या हस्ते केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांचा शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दिलेल्या भेटी प्रसंगी दिनकरराव ताके पाटील यांनी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे,स्व.प्रमोदजी महाजन,जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या बरोबर पक्षासाठी केलेले कार्य विषद करून जुन्या स्मृतींना उजाळा दिला.

newasa news online
रक्षाताई

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रक्षाताई
रक्षाताई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रक्षाताई