नेवासा – सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिन सोहळयाच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या जवळ असलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या महास्थान महानुभाव आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी दि.५ सप्टेंबर रोजी करण्यात आले असल्याची माहिती श्री. शाममुनी अंकुळनेरकर यांनी दिली.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक पुर्ण परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिन महोत्सवाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ,श्रेष्ठ,आचार्य,संत महंत,तपस्वी तसेच राजकिय, सामाजिक, साहित्यीक यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.गुरूवार दि. ०५/०९/२०२४ रोजी सकाळी ६.०० वा. देवास मंगल स्नान व आरती,सकाळी ७ ते ९ श्रीमदभगवदगीतेचे पठण,सकाळी १० ते ११.३० नव युवकांचे प्रेरणास्थान प.पु.ई.श्री. योगीराज दादाजी मचाले महानुभव (लिंगमपल्ली, तेलंगणा)यांचे प्रवचन,
दुपारी १२.०० महाआरती होणार आहे.
यानंतर अन्नदाते बंडु पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री ९ ते १२ सावता महाराज भजनी मंडळ करजगांव यांचे भजन सोहळयाचा कार्यक्रम होऊन अवतार दिन सोहळयाची सांगता होणार असून या धार्मिक सोहळयाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नेवासा येथील चक्रधर स्वामी महास्थान आश्रमाचे प्रमुख श्री.शाममुनी अंकुळनेरकर यांनी केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.