नेवासा – शालेय जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय व त्रिमूर्ती पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांनी सोळा सुवर्ण तीन रौप्य व पाच कांस्य पदकाची कमाई केली.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा कार्यालय तसेच दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय कुस्ती स्पर्धा दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२४ रोजी १४,१७ व १९ वर्ष मुले व मुली वयोगटात कुस्ती स्पर्धा दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच त्रिमूर्ती पब्लिक स्कूल त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा येथील खेळाडूंनी या स्पर्धेत पदक प्राप्त केले विजयी खेळाडू पुढील प्रमाणे
१४ वर्ष समीक्षा रुपेश राऊत, प्राप्ती प्रकाश निपुंगे यांनी प्रथम क्रमांक पटकावले तसेच वेदांत नितीन बोरुडे याने द्वितीय क्रमांक तर सार्थक संभाजी शिरसाठ, पवन रवी बारगळ यांनी तृतीय क्रमांक पटकावले
१७ वर्षाखालील वयोगटात प्रमोद राम बहिरवाळ,समर्थ गोरख गायकवाड, जयदीप गोरख पुऱ्हे,शंतनु गणेश धुमाळ, अतिक संदीप लांबकाने पृथ्वीराज संजय सुखदान, रोहित अजय आजबे,माधुरी बाळू अंभोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावले तर रामेश्वर भाऊसाहेब पहारे व सहदेव रुपेश राऊत याने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच प्रशांत संतोष रुपनेर याने द्वितीय क्रमांक तर प्रणव संदीप वाकचौरे याने तृतीय क्रमांक पटकावला.
१९ वर्ष अतुल संतोष मोरे, शुभम मनोहर जाधव, सुशांत विजय धायगुडे, ओमराज रमेश नखाते, सिद्धार्थ संजय सुखदान, तर फ्रीस्टाइल प्रकारात कार्तिक शिवाजी नवघरे,आर्या गणेश शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावले तर अजिंक्य सुनील होळकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर शुभम आण्णा पिसाळ याने तृतीय क्रमांक पटकावला प्रथम क्रमांक विजेत्या खेळाडूंची विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे कुस्ती प्रशिक्षक संभाजी निकाळजे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
तसेच क्रीडा शिक्षक अभिजीत दळवी,महादेव काकडे, छबुराव काळे ,गणेश शिंदे, अशोक पानकडे, साहेबराव दाने, संदीप वाघमारे, मुकेश जाधव, नितीन चिरमाडे,गौरव दाने यांचे सहकार्य लाभत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेबराव घाडगेपाटील, अध्यक्षा सौ. सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्ष स्नेहल दीदी घाडगेपाटील, सचिव मनीष घाडगेपाटील, राष्ट्रीय खेळाडू प्राचार्य सोपानराव काळे, पर्यवेक्षक संजयसिंह चौहान,प्राचार्य सचिन कर्डिले, समन्वयक दत्तात्रय वांडेकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.