कुकाणा – विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी चिलेखनवाडी ग्रामपंचायतची क्षयमुक्त ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती सरपंच प्रा . भाऊसाहेब सावंत यांनी दिली आहे .
चिलेखनवाडी ता नेवासा हे गाव आदर्श करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे सरपंच , उपसरपंच व सर्व सदस्य यांनी आरोग्य शिबिरे , राष्ट्रीय सेवायोजना शिबिराद्वारे स्वच्छता अभियान , वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण , संपूर्ण गावात स्ट्रीट लाईट , सुंदर शाळा व अंगणवाडी , रस्ते विकास , भव्यप्रवेशद्वार , लोकवर्गणी व श्रमदानातून बहुउद्देशिय दक्षिणमुखी हनुमान मंदिर सभामंडप , करोना काळात लोकवर्गणीतून आरोग्य सुविधांची उपलब्धता व किराणा मालासह अन्नधान्य वाटप , मजूरांसाठी मोफत भोजन , ग्रंथालय , अंगणवाडी , शाळा इमारत आदि सुधारणा अल्पावधित घडून आणल्या आहेत.
धार्मिक सप्ताहाचे आयोजन करून प्रबोधन केले आहे . लोकवर्गणीतून महादेव मदिर , मुक्ताई मंदिर निर्मिती केली आहे .
जिल्हा वैद्यकिय पथकाने नेवासा तालुक्यातील सर्व गावांची पहाणी करून परिक्षणानुसार क्षयमुक्त ग्रामपंचायत पुरस्कारासाठी चिलेखनवाडी गावाची निवड केली आहे . हा पुरस्कार सोमवार दि .२ .९ २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे . सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र , म .गांधीचे कास्य शिल्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे . या कार्यक्रमासाठी सरपंच भाऊसाहेब सावंत उपसरपंच नाथा गुंजाळ , सर्व सदस्य , वैद्यकिय पर्यवेक्षक शर्मिष्ठा चौधरी , रोहिणी जाधव ग्रामसेवक बाळासाहेब काळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे .
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.