ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आंदोलन

नेवाशात शिवप्रेमींनी मालवण घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला..

नेवासा – भर मुसळधार पावसात मालवण येथील घटनेच्या निषेधार्थं नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौकात शिवप्रेमीकडून अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेल्या छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांच्या आत कोसळलेला या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर पसरले आहे. नेवासा तालुक्यात देखील तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमीकडून आक्रमक भूमिका घेत आंदोलने करण्यात येत आहे. आज नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात शिवप्रेमीकडून अहमदनगर- संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्ते संभाजी माळवदे यांनी छत्रपतींचा पुतळा कोसळला ,बदलापूर येथे आमच्या बहिणीवर अत्याचार झाले,शेतकरी आत्महत्या करु राहिले, विद्यार्थी आत्महत्या करत आहे,मराठा आरक्षण प्रश्न चिघळत आहे, शासकीय भर्ती मधे घोटाळा झाले, अशा अनेक विषयावर आवाज उठविल्यास सरकार म्हणते राजकरण करु नका. असे किती दिवस जनतेला गप्प बसविणार. याचा ज्वालामुखी आता फुटणारच. ॲड.कल्याणराव पिसाळ यांनी पुतळ्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर,बील काढणाऱ्यावर, यात सहभागी सरकारच्या मर्जीतील राजकिय व्यक्तीवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अशी ठोस मागणी करत सरकार कोणाचेही असो परंतू मालवण घटनेमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान मात्र जमीनदोस्त झाला आहे असे मत मांडले. रावसाहेब घुमरे यांनी समाजाच्या प्रश्नापेक्षा प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या शिवद्रोही सरकारला महाराष्ट्रातील जनता माफ करणारं नाही.

एड.बन्सी सातपुते यांनी विकासकामात होणारा भ्रष्टाचार,मर्जीतल्या ठेकेदाराना मिळणारे टेंडर या गैरप्रकारमुळे अशा घटना घडत आहे मग समृद्धी महामार्गास पडलेले भगदाड,विमानतळाचे कोसळणारे छत, पुरात वाहून जाणारे पुल, संसद भवनला लागलेली गळती, अयोध्या मंदिरात होणारी गळती, आणि आता पुतळा कोसळन या सर्वास भ्रष्टाचारी सरकार कारणीभूत आहे. गणेश झगरे यांनी राजकोट येथे नुसता पुतळा कोसळला नाही तर मराठी माणसाची अस्मिताच कोसळली असे सांगत मालवण घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. गणपत मोरे यांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून इव्हेंट करण्याच्या घाईत पंतप्रधान अनावरण करतात व श्रेय घेतात आज नौदलावर खापर फोडतात,मग आज जबाबदारी झटकून का टाकतात. याला जबाबदार राज्य व केंद्र सरकार आहे. महायुतीला याचे प्रायचित्त भोगावेच लागेल.

आकाश धनवटे यांनी सर्व घटनेचा शोध स्वतंत्र यंत्रणेद्वारे घ्यावा असे स्पष्ट करत मालवण घटनेचे परिणाम बीजेपीसह महायुतीला भोगावेच लागतील असे स्पष्ट केले. यावेळी भर पावसात दिलेल्या जय भवानी..जय शिवाजी.. जय जिजाऊ..जय शिवरायच्या.. घोषणांनी परिसर दणाणून गेला.या आंदोलनात काँग्रेसचे अंजुम पटेल, सतिष तऱ्हाळ, संतोष काळे, बसपाचें विकास चव्हाण, बबलु डांगे, तुषार उंदरे,शेषराव गव्हाणे, त्रिंबक भदगले, मीराताई गुंजाळ, सुमित पटारे,यांच्यासह नेवासा तालुक्यातील शिवप्रेमींनी सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे यांना नेवासा पोलीस ठाण्यात ठेकेदार व यात दोषिवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले.

आंदोलन
आंदोलन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंदोलन
आंदोलन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंदोलन