ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रामदास आठवले

शिर्डी विमानतळा वरून नगर येथे जात असताना नेवासा फाटा येथे कार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत…

नेवासा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले मुंबईहून शिर्डी येथे विमानतळाहून अहमदनगर येथे जात असताना नेवासा फाटा येथे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,तालुकाध्यक्ष सुशील धायजे, पप्पू इंगळे, बाळासाहेब ठोंबरे यांचे सह आरपीआय (आठवले गट) च्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजित भव्य असा नागरी सत्कार केला. यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त असलेल्या शांतीनगर, तारा पार्क येथील साधारण 250 कुटुंब असलेल्या रहिवाशांनी आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुशील धायजे यांना विनंती करून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन रहिवाशांना जाण्या येण्याचा रस्ता खुला करून देण्यासंदर्भात निवेदन देऊन आपली कैफियत मांडली. लवकरात लवकर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी आठवले यांनी उपस्थिताना दिले.

यावेळी सदर परिसरातील शंभर ते सव्वाशे महिला हजर होत्या. सदर कार्यक्रमास गणपत मोरे, भास्करमामा लिहिनार, पप्पू कांबळे, रंजनाताई पंडुरे, राजू इंगळे, आदिसह 400 ते 500 कार्यकर्ते उपस्थित होते. तर नेवासा पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस किरण गायकवाड यांनी आंबेडकर चौकातअतिशय चोख नियोजन ठेवल्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.

रामदास आठवले
रामदास आठवले
रामदास आठवले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रामदास आठवले
रामदास आठवले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रामदास आठवले