नेवासा – हिंदू समाजाच्या विकासासाठी योगदान देण्याची तळमळ आणि लहान मुलांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याचा दृढ संकल्प मनाशी ठेवून, नेवासा येथील पुरातन काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात तरुणांनी मागील वर्षीच्या श्रावण महिन्यापासून दर सोमवारी एकत्र येऊन महादेवाची महाआरती सुरू केली आहे.
या उपक्रमातून तरुणांनी एकत्र येण्याचा, समाजासाठी काहीतरी विधायक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. दर सोमवारी शहरातील आणि परिसरातील 500 ते 700 नागरिक महाआरतीत उत्साहाने सहभागी होतात. विशेषतः तरुणांच्या मोठ्या सहभागामुळे, ही आरती एक सशक्त चळवळ बनली आहे. मागील श्रावणात तरुणांनी संकल्प केला की ही आरती अविरतपणे सुरू राहावी, आणि आज त्या संकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
यावर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी रामकृष्ण आश्रम नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाराज, दुसऱ्या सोमवारी सद्गुरू नारायनगिरी आश्रम नेवासा येथील हभप उद्धव महाराज मंडलिक तिसऱ्या सोमवारी समस्त माता भगिनी चौथ्या सोमवारी मध्यमेश्वर देवस्थान येथील श्री बालयोगी ऋषीकेशनाथ महाराज आणि पाचव्या सोमवारी ज्ञानेश्वर मंदिर येथील हभप देविदास महाराज म्हस्के या संत महंत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या महाआरतीने तरुणांना एकत्र आणून समाजाला एक नवा ऊर्जाश्रोत दिला आहे, ज्यामुळे समाजातील सगळ्या स्तरांमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि उमेदीची भावना जागृत झाली आहे.
हे तरुण त्यांच्या सामूहिक शक्तीचा वापर करून समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे युवा सशक्तीकरणाला एक नवा अर्थ मिळाला आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.