ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

नेवासा – नेवासा फाटा येथील बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून चोरीस गेलेले दागीने फिर्यादीला परत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
नेवासा पो. स्टेशनला दाखल असलेल्या गुरनं. ५०८/२०२४ भादविक ४५४,४५७,३८० या गुन्ह्यात फिर्यादी किशोर रावसाहेब शिंदे (वय ७०) रा. नेवासा फाटा यांचे बंद घराचे कुलूप तोडून २६ मे २०२४ रोजी अज्ञात चोरटे ६० हजार रुपयांचे गंठण, ४० हजार रुपये किमतीचा गळ्यातील सर, १८ हजार रुपये किमतीचे झुबे, २० हजार रुपये किमतीची कानातील बहुराणी, नथ, अंगठी व ६ हजार ६०० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता.

पोलीस

जालना जिल्ह्यातील चोरट्यांकडून पोलिसांनी सदर ऐवज हस्तगत केला. हे सर्व सोन्याचे दागीने फिर्यादी किशोर रावसाहेब शिंदे व त्यांची पत्नी प्रमिला किशोर शिंदे यांना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या हस्ते परत देण्यात आला. त्यांनी पोलीस निरीक्षक श्री. जाधव व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे व कॉन्स्टेबल अंबादास जाधव यांचे आभार मानले आहेत.

https://maheshvarta.in/crime-ex-employee-eat-anda-rice-with-boss-later-killed-him/
newasa news online
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस