नेवासा : नेवासा येथे बैल पोळयाच्या निमित्त बैलजोडयांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शेकडो बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.पोळयाच्या पूर्वसंध्येला पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत होते. परंपरेने चालत आलेल्या प्रथेप्रमाणे उपऱ्याच्या बैलजोडी जोडीला मान देण्याची येथे प्रथा आहे.त्याप्रमाणे रामेश्वर कदम यांच्या टोपी उपरणे देऊन मानाच्या जोडीचे मालक यांचा सत्कार करण्यात आला.
मानाच्या जोडीचे मारुती चौक येथे आगमन झाल्यानंतर जनसेवक लक्ष्मणराव जगताप,गफूरभाई बागवान, राजेंद्र मापारी सतीश गायके,शिवा राजगिरे यांच्या हस्ते व हारूणभाई जहागीरदार,जयवंत मापारी,पंकज जगताप, दिपक धोत्रे,अनिल सोनवणे,राजेंद्र कडू,विठ्ठल मैंदाड, विष्णू जाधव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. नेवासा येथील जुन्या पेठेतील राममंदिर चौकातील चक्रधारी गणपती मंदिरापासून बैल जोड्यांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला मानाच्या बैलजोडीच्या मालकाला शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली.यावेळी सुवासिनीच्या हस्ते औक्षण करून बैलजोडयांना पूरणपोळीचा निवैद्य देऊन बैल पोळा मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
नेवासा येथील मारुती चौकात असलेल्या मंदिरात नारळ वाढवून बैल जोड्यांच्या मालकांनी मारुतीरायाचे दर्शन घेतले.आधुनिक युगात कितीही नवीन तंत्रज्ञान आले असले तरी नेवासा येथील बैल जोड्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा व तिची जपवणूक अजून ही या भागातील रहाणाऱ्या शेतकऱ्यांनी जपली असल्याचे यावेळी निघालेल्या मिरवणुकीतून दिसून आले.
बैलांची शिंगे रंगवून त्यांचा साजशृंगार करून शिंगांना फुगे लावून गळ्यात घुंगर माळा घातल्याने बैलजोड्या उठून दिसत होत्या.बैल जोड्याची निघालेली मिरवणूक पहाण्यासाठी मारुती मंदिर चौकात बाल अबालवृद्धांसह युवकांनी मोठी गर्दी केली होती.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.