नेवासा – नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथे ब्रम्हलिन गुरुवर्य ह.भ.प.रामकृष्ण काळे गुरुजींनी स्थापित केलेल्या श्री विठ्ठल रुख्मिणी आध्यात्मिक केंद्र (रामकृष्णाश्रम)येथे वेदमूर्ती हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संत महंतांच्या उपस्थितीत संतपूजन व स्नेहभोजन सोहळयाने श्रावणमासाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.मतभेद बाजूला ठेऊन धर्म कार्याला गती देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन संत मेळाव्याप्रसंगी करण्यात आले.
श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री सुनीलगिरीजी महाराज हे झालेल्या संत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के, विठ्ठल रुख्मिणी आध्यात्मिक केंद्र रामकृष्णाश्रमचे प्रमुख महंत वेदमूर्ती ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री,मुक्ताई आश्रमाचे महंत गोपालानंदगिरीजी महाराज मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख बालयोगी ऋषिनाथजी महाराज,स्वामी ज्ञानानंदगिरीजी महाराज,महंत योगी दीपकनाथजी महाराज,हभप विश्वनाथगिरी महाराज यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या संत मेळाव्याच्या प्रसंगी श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी रामकृष्ण आश्रमाच्या वतीने त्यांचे हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी संतपूजन केले. झालेल्या संत मेळाव्यात संत महंतांचे श्री विठ्ठल रुख्मिणी आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख व संत पूजन सोहळयाचे मार्गदर्शक ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी स्वागत केले.
संतभोजन कार्यक्रमाचे अन्नदाते आदर्श ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे व शिक्षक दादासाहेब खरात,संयोजक बदाम महाराज पठाडे यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे वस्त्र गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन संतपूजन करण्यात आले.संत मेळावा समितीचे सदस्य संतसेवक पत्रकार सुधीर चव्हाण यांनी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने या संत पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामागील उद्देश प्रास्ताविकात बोलतांना विषद केला.
यावेळी बोलतांना वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के म्हणाले की धर्म कार्यासाठी आपापसातील मतभेद विसरा,संत म्हणून नव्हे तर संत सेवक म्हणून धर्म कार्य करण्यासाठी काम करा असे आवाहन केले.महंत सुनील गिरी महाराजांनी जो आपल्या धर्मासाठी काम करतो तो आपला,जो धर्म मानीत नाही त्याला आपला कधीच समजू नका,धर्म कार्यासाठी वेळ द्या असे आवाहन केले.
यावेळी झालेल्या संत मेळाव्याच्या प्रसंगी बाळकृष्ण महाराज सुडके,रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, चांगदेव महाराज काळे,दादा महाराज वायसळ,योगेश महाराज पवार,शुभम महाराज कांडेकर,निलेश महाराज रोडे, ह.भ.प. रामनाथ महाराज पवार,संजय महाराज सरोदे,हभप मुंगसे महाराज,मंगेश महाराज वाघ,अतुल महाराज आदमने, साहेबराव महाराज चावरे, कोंडीराम महाराज पेचे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,हरि महाराज भोगे,श्रीहरि महाराज वाकचौरे,गहिनीनाथ महाराज आढाव,विजय महाराज पवार यांच्यासह अहमदनगर जिल्हयातील संत महंत कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित संत महंतांसह भाविक वारकरी यांनी मिष्टान्न स्नेहभोजन देण्यात आले.योगेश महाराज पवार यांनी आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.