नेवासा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नेवासा येथील डॉ.हेडगेवार पतसंस्थेला भेट देऊन पहाणी केली.डॉ.हेडगेवार पतसंस्थेच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलेल्या भेटी प्रसंगी डॉ.हेडगेवार पतसंस्थेचे संचालक अरविंद मापारी,सुभाष कुलकर्णी,अध्यक्ष सुरेशराव नळकांडे,उपाध्यक्षा सौ.मीनाताई परदेशी, संचालक शाम मापारी,विनोद नळकांडे,कैलास करंडे, नंदा नळकांडे,व्यवस्थापिका कावेरी नाबदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ बुके देऊन ना.रक्षाताई खडसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रक्षाताई खडसे यांनी डॉ.हेडगेवार पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानून पतसंस्था डॉ.हेडगेवार यांच्या नावाला साजेशे कार्य करत असून पतसंस्थेला उज्वल भवितव्य लाभेल अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलेल्या भेटी प्रसंगी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,
इंजिनियर सुनीलराव वाघ,अँड.संजीव शिंदे,अशोकराव ताके,दुर्गा वाहिनीच्या सौ.अमृता नळकांडे,श्रीकांत नळकांडे, अशोक केणे, मनोज देव,गणेश नाबदे,राम सचदे उपस्थित होते.संचालक शाम मापारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.