ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

ईद ए मिलाद

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गणेश उत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. दि. ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी तसेच दि. १६ सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद याच अनुषंगाने असल्या कारणाने दि. ४ सप्टेंबर रोजी घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर गणपती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पोलीस पाटील, डि जे चालक-मालक, ईद मिलाद अध्यक्ष तसेच पोलीस मित्र, यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये गणेश मंडळ यांनी गणेश मुर्तीची स्थापनेपूर्वी घ्यावयाची कायदेशीर परवानगी, मंडप जागा, विज कनेक्शन, स्वयंसेवक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरा लावणे व बॅनर बाबत ग्रामंपचायत चा नाहरकत दाखला घेणे,

ईद ए मिलाद

तसेच सार्वजनिक मंडळाचे गणेश विसर्जनाचे सुचना तसेच मुर्तीची विंटबना होणार नाही याबाबतची काळजी व सार्वजनिक मंडळाचा देखावा तयार करण्यापुर्वी जातीय व धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही यांच्या सुचना तसेच सण उत्सव काळात सोशल मिडीयाचे माध्यमातुन कुठल्याही धर्मांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही. याचे सविस्तर मार्गदर्शन गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांना सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी केले.करण्यात . तसेच सोनई पोलीस स्टेशन हद्दीत शांतता राखण्याबाबत आव्हान देखील या वेळी करण्यात आले. या वेळी व्यापारी असोशिएशन चे अध्यक्ष अशोक नाना येळवंडे, सरपंच राजेंद्र देसरडा, उप सरपंच यशवंत येळवंडे, वसंतराव सोनवणे, पोलीस पाटील भगत वैरागर, बाळासाहेब सोनवणे, जनार्दन सोनवणे, सय्यद गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य अलिभाई, पो.काॅ.ज्ञानेश्वर आघाव, पो, काॅ. रवी गर्जे, पो. काॅ. रामदास तमनर,पो.ना.बाळासाहेब बाचकर सह परिसरातील गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील , सरपंच,उप सरपंच,मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईद ए मिलाद
ईद ए मिलाद
ईद ए मिलाद

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ईद ए मिलाद
ईद ए मिलाद

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ईद ए मिलाद