गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने ५ सप्टेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याची विनंती केली आणि तेव्हापासून दरवर्षी भारतात ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो.
९वी व १०वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी कार्यक्रम व खेळ आयोजित केले होते.विद्यार्थी शिक्षकांच्या वेशभूषेत आले होते विद्यार्थ्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार देखील या वेळी करण्यात आला . बक्षीस देखील देण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल असणाऱ्या भावना त्यांच्या भाषणातून व्यक्त केल्या.
आपल्या आई-वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळतं, पण ते आयुष्य कसं जगावं हे शिक्षकापेक्षा कुणीच सांगू शकत नाही. आपल्या पालकांनंतर आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या शिक्षकांना जाते कारण आपल्या मेहनतीबरोबरच हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. शिक्षक म्हणजे आपल्या जीवनाचा तो दिवा, जो स्वतः जळतो आणि आपल्या आजूबाजूला पसरलेला अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश भरतो.असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका किर्ती बंग यांनी सांगितले. या वेळी शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.