ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

श्रीराम

नेवासा – नेवासा तालुक्यातील मुकींदपूर येथील चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत गुरुवर्य श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळयाच्या निमित्ताने संतपूजन व अभिष्टचिंतन सोहळयाला भाविकांची मांदियाळी जमली होती.धर्म जागृतीसाठी महंत सुनीलगिरीजी महाराजांचे मोठे योगदान असून त्यांचे कार्य युवा शक्तीला प्रेरणा देणारे आहे धर्म कार्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन पैठण येथील साध्वी सुवर्णानंद चैतन्य यांनी यावेळी बोलतांना केले.
     महंत सुनीलगिरी महाराज यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून झालेल्या संतपूजन सोहळयाच्या प्रसंगी साध्वी सुवर्णानंद चैतन्य यांचे किर्तन झाले.कीर्तनात त्यांनी धर्मावर विविध पद्धतीने येत असलेल्या संकटाबाबत प्रबोधन करत  धर्म जागृतीसाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले.किर्तनांतर महंत सुनीलगिरी महाराज यांचे किर्तन मंडपात आगमन झाल्यानंतर रामनामाचा जयघोष  व टाळ्यांचा गजर केला तर वरूणराजाने सडामार्जन करत त्यांचे स्वागत केले.

यावेळी झालेल्या संतपूजन सोहळयास उपस्थित संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर,भक्त मंडळाच्या वतीने महंत सुनीलगिरीजी महाराज यांचे संतपूजन करून त्यांना जन्म दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.शिक्षक दिन असल्याने उपस्थित भाविकातील शिक्षकांचा यावेळी शाल श्रीफळ व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला.तर वेदशास्त्रसंपन्न पुरोहित प्रकाशगुरू मुळे व सौ.मेघाताई मुळे यांच्या हस्ते उपस्थित कन्यांचे पूजन करण्यात आले.

यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रम प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज यांनी श्रीराम साधना आश्रमाला भेट देऊन महंत सुनीलगिरीजी महाराजांचे संतपूजन करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.संतपूजन सोहळा कार्यक्रम प्रसंगी साध्वी सुवर्णानंददीदी चैतन्य,कीर्तनकार तुलसीदीदी,जयाताई घाडगे,महंत श्री जगदीशगिरी महाराज, महंत श्री पंचमपुरी महाराज,ज्ञानेश्वर माऊली शिंदे,ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,नवनाथ महाराज घाडगे, सचिन महाराज पवार,शिवचिदंबरम महाराज,विठ्ठल महाराज नाईक,शंकर महाराज तनपुरे, माऊली महाराज मोरे,गणेश महाराज गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.

श्रीराम

या सोहळयाला राजगुरू महाराज,हभप कांबळे महाराज,हभप गोरे महाराज,हभप सुसे महाराज, भाऊसाहेब महाराज गायकवाड,हभप पठाडे महाराज, पांडुरंग गणगे महाराज,संतसेवक पोपट महाराज निपुंगे, वैभव निकम,रावसाहेब कांगुणे,महेश कदम,भिवाजीराव आघाव,खा.वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे,भाऊसाहेब येवले, बाळासाहेब वखरे,बंटीभाऊ गटकळ,भाऊसाहेब गायकवाड,सीताराम निपुंगे, प्रकाशगुरू मुळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना चांदगाव येथील सौ.मेघाताई बंडोपंत मुळे व उजैनी पिंपळगाव येथील सेवेकरी बाळासाहेब वाघ परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर संतसेवक वैभव निकम यांनी आभार मानले.

श्रीराम
श्रीराम
श्रीराम

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीराम
श्रीराम

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीराम