नेवासा – नेवासा येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतील एकूण ऐंशी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून भूमिका बजावली. अध्यापन करताना शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
अध्यापन झाल्यानंतर शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी पेन व गुलाबपुष्प देऊन पस्तीस शिक्षक व कर्मचारी यांचा सत्कार केला. आपल्या मनोगतात शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात मोठे यश मिळवून शिक्षकांना अभिमान वाटेल असे काम करू हा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्या प्रा.राधाताई मोटे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून भूमिका बजावल्याबद्दल व सर्व शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन यश संवाद विभाग व विद्यार्थी यांनी केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.