ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

सुनीताताई गडाख

नेवासा – एवरेस्ट अबॅकस अकॅडमी ३० व्या नॅशनल लेवल कॉम्पिटिशन नेवासा फाटा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात नुकत्याच संपन्न झाल्या.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सभापती सुनीताताई गडाख ह्या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार संजय बिराजदार होते.यावेळी सकाळच्या सत्रात स्पर्धा झाल्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम,मुलामुलींच्या सुरक्षेच्या संदर्भात चला निर्भय होऊया..हा शपथ कार्यक्रम व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षणार्थी तहसीलदार रवी सतवन, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार,तालुका विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण खंडाळे,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे,संचालिका कल्पना घडेकर,प्रमुख अशोक घडेकर, मंडळाधिकारी फिरोज सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णासाहेब शिंदे यांनी करत तिसाव्या नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन चे यजमान पद नेवासा शाखेला प्रथमच मिळाले असल्याने नेवासा शाखेच्या वतीने आभार मानले. तसेच प्रास्ताविकातून संस्थेच्या इतर सामाजिक व महिलांच्या सबलीकरण कार्याची माहिती दिली. या स्पर्धेत संभाजीनगर,श्रीरामपूर, राहुरी, गंगापूर, पाथर्डी ,नेवासा, श्रीगोंदा कोपरगाव ,कन्नड या जवळपास सतरा सेंटरमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावर्षी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन ऑनलाईन व ऑफलाइन अशा अकरा टप्प्यात होऊन सुमारे साडेनऊ हजार विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून नेवासा येथे नवव्या टप्प्यात ७४७ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.

या परीक्षेत लहान गटात वाजिद सय्यद,असद शेख,शौर्य गट, फैजान शेख, तन्मय नागलोट, संस्कृती सदाफळ यांनी चॅम्पियन विजेतेपद पटकावले.तर मोठ्या गटात संस्कार शिंदे, प्राजक्ता म्हस्के, सृष्टी डमरे, हमजा शेख,यश मालपानी,अथर्व ढोबळे, वैष्णवी गोरे, ऋतुजा नवसारे, आराध्या पठारे, विद्या म्हस्के, ज्ञानेश्वरी म्हस्के या मुलांनी चॅम्पियन विजेते पदक पटकावले. एवरेस्ट अकॅडमीच्या यावर्षी प्रथमच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षक अरविंद घोडके,राहुल आठरे,रविंद्र पागिरे, रवी महागावे,सुनिता कर्जुले, शिवाजी पटारे, प्रशांत लबडे, अशोक अभंग, त्रिभुवन चंद्रदत्त,कल्याण नेहुल यांचा शाल,सन्मानचिन्ह व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.

सुनीताताई गडाख

मान्यवरांच्या हस्ते झालेले बक्षीस वितरण कार्यक्रमात वेदांत गोरे, संस्कृती कुटे,राजवीरसिंग परदेशी, आयुष मचे, स्वराज वाघ, अर्शान सय्यद, राजवीर शिंदे, ज्ञानेश्वरी म्हस्के, अनुराधा म्हस्के, प्रज्वल जाधव, अवनी जंगले, सोहम बिस्वास हे अबॅकस मास्टर पदवीचे मानकरी ठरले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक अमोल बागुल यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार नेवासा शाखेच्या संचालिका गितांजली शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एव्हरेस्ट अकॅडमी चे सर्व शिक्षक वृंद, सहकारी व पालक यांचे सहकार्य लाभले.

newasa news online
सुनीताताई गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सुनीताताई गडाख
सुनीताताई गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सुनीताताई गडाख