सोनईचे संदिप कुसळकर यांची युवक तालुकाध्यक्ष पदी निवड.
सोनई | संदिप दरंदले – सोनईचे सामाजिक कार्यकर्ते संदिप कुसळकर यांची नेवासा तालुका युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेल्हेकर, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सरपंच सतीश थोरात, अध्यक्ष श्रीहरी लांडे, दिलीपकाका शिंदे, कवी एस. बी. शेटे साहेब आदी उपस्थिती होते.
यावेळी बोलताना खा.निलेश लंके,यांनी आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याबद्दल वीस मिनिट भाषण अतिशय मुद्देसुद भाषण केल्याने उपस्थिती जनसमुदाययाची मने जिंकली.यावेळी नेवासा तालुक्यातील पद ग्रहण समारंभ व लोकसभा सदस्यपदी निवडून आल्या बद्दल सत्कार केला. यावेळी माका येथील सरपंच अनिल घुले व तालुकाध्यक्ष सतीश थोरात यांच्या पुढाकारातुन माका येथे घुले वस्तीवर कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खा.लंके म्हणाले पद फक्त कार्ड वर टाकण्यासाठी घेऊ नका नका गोरगरीबा मध्ये देव पाहून त्याची सेवा करा. आपलं काही नाही कोरानात मेल्यावर कोणी नातेवाईक सुद्धा भेटायला येत नव्हते. म्हणून गरीबाची कामे करा यातून माणूस नावारूपाला येतो. मी सरपंच असताना माझ्या गावच्या बांधकामा वर मी पाणी मारलं यामुळे मी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य झालो.
येथे पण आदर्श काम केल्याने विधानसभासभेत गेलो.आमदार झालो त्यावेळी कोरोना आजार आला नेते मंडळी मास्क किट लावून हिंडत असतं मी मात्र आदरणीय शरदचंद्र पवार कोरांना सेंटर चालून पेशंट मध्ये राहून 33 हजार लोकांना जीवनदान दिले.या पुण्याईच्या जोरावर लोकसभेला निवडून आलो. समोर पर्वत होता पण गोरगरीब जनतेच्या जोरावर मी यशस्वी झालो. म्हणून गोर गरिबांचे काम करा पद येते जाते पण मेल्यावर पंचवीस वर्ष तरी आपले नाव अजरामर राहिले पाहिजे. आपला फायदा न पहाता जनसेवा करावी असे खा. निलेश लंके यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी अभिजीत ससाणे सर यांनी आभार मानले.उपस्थिती जनसमुदायला अल्पोहार देण्यात आला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.