नेवासा – तालुक्यातील टोका प्रवरासंगम येथील बबलू संतोषराव लकारे यांची मुंबई उच्च न्यायालय येथे स्वीय सहाय्यक (क्लास १) अधिकारी या पदी निवड झाल्याने ग्रामस्थांकडून व मित्र परिवाराकडून भरभरून कौतुक होत आहे बबलू दोन वर्षाचा असताना पितृछत्र हरवलं गेलं आणि आई मुलांवर वनवासात संकट कोसळलं गेलं आईने जिद्द न सोडता मोल मजुरी करून मुलांचं संगोपन केलं आणि मुलांना पायावर उभं केलं.
बबलू ला शिक्षणाला लागणारा खर्च मोलमजुरी करून पुरवला वेळप्रसंगी आईने कर्ज काढून शिक्षणाला पैसा पुरवला त्याची जाण मात्र बबलू ला नक्कीच होती त्यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून आईचे स्वप्न पूर्ण करण्या कामी जणू ध्यासच घेतला होता आणि तो सोन्याचा दिवस २७ ऑगस्ट २०२४ रोजी उजाडला आणि बबलू ची राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाली.
टोका प्रवरा संगम येथे ठीक ठिकाणी बबलू लकारे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी दीपक आगळे, शुभम उगले, राहुल लकारे, योगेश पांडव ,रविकांत जांवले ,किरण भालेराव , आरुन गंगुले , कांतिलाल गंगुले , विठ्ठल गंगुले , नितिन लिंबोरे आदी उपस्थित होते
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.