गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील रस्तापुर येथे शिव रस्ता खुला करणे कामी अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार नेवासा तहसील येथे नायब तहसीलदार म्हणून संदिप मधुकर चिंतामण वय ५६ रा. शेवगाव हे संजय गांधी योजनेचे काम पहातो आहे. सहा महिन्यापासून मा. तहसीलदार साहेब नेवासा यांचे लेखी आदेशानुसार चांदा – रस्तापुर शिवरस्ता खुला करण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार शिव रस्ता गटातील लोकांना हजर राहण्या संबधी नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या.
त्या नुसार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी मि व संबधित तलाठी पंच यांचे समक्ष त्या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी संध्या माधव कोथिंबीरे, संगिता आदिनाथ कोथिंबीरे, वैशाली अविनाश कोथिंबीरे, स्वाती ज्ञानेश्वर कोथिंबीरे सर्व रा. रस्तापुर यांनी हा रस्ता खुला करायचा नाही. असे म्हणत जेसीबी मशीनला आडव्या होत काम बंद पाडले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी वरुन वरील लोकांविरुद्ध बिएन एस चे कलम १३२,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. भाऊसाहेब पगारे हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.