ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

आरती

नेवासा – नेवासा येथील अभिनव उपक्रम राबविणाऱ्या सदाशिवनगर येथील सदभावना मित्र मंडळाच्या वतीने माजी सैनिक व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाच्या स्वच्छता दूतांच्या हस्ते आरती करण्यात येऊन गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
            यावेळी झालेल्या गणेश स्थापना प्रसंगी माजी सैनिक मेजर महेश कुलकर्णी, मेजर दीपक देशमुख,श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा स्वच्छता सेवक मंडळ, करंजगाव, लांडेवाडी,तिळापुर परिसरातील स्वच्छतादूत उमाकांत कंक, मेजर अशोक काळे,रावसाहेब काळे, चंद्रकांत जाधव, शांतीलाल जाधव,किरण माकोणे, भाऊसाहेब माकोणे, गणेश चिंधे,सागर माकोणे,सचिन माकोणे,वरूण माकोणे, सिद्धार्थ जाधव,संदीप माकोणे यांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात आली.बालूगुरू जोशी यांनी झालेल्या आरती सोहळयाचे पौरोहित्य केले.

आरती

यावेळी माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, इंजिनियर संजय खर्डे,बदामबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर,सदभावना मंडळाचे मार्गदर्शक पत्रकार अभिषेक गाडेकर,नचिकेत कुलकर्णी, शिवम कानडे,संतोष गाडे,किरण घोडेकर,डॉ.जालिंदर गोरे,प्रा. विजय आडसूरे,रुपेश बेंद्रे,यश देसरडा,वेदांत कुलकर्णी,अथर्व कुलकर्णी,ऋषि शेटे,अनिल शिंगी,सुशांत जोशी,आदित्य वाल्हेकर,सुमित कुलकर्णी,ज्ञान विखोना, आदित्य चव्हाण,आनंद होडकर उपस्थित होते.

आरती

उपस्थित आरतीचे मानकरी स्वच्छता दूतांसह माजी सैनिकांचा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते गुलाबाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. आरतीच्या यजमानांनी सदभावना मित्र मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिलेला  संदेश आत्मसात करून समाजात एकोपा नांदण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले तसेच देशाची राष्ट्रीय एकता व अखंडता मजबूत राहू दे,बळी राजा सुखी होऊ दे,स्त्री शक्तीचा उद्धार होऊ दे, असे साकडे गणरायाला घातले.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर पत्रकार अभिषेक गाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आरती
आरती

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरती
आरती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरती