गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ५ सप्टेंबर रोजी फिर्यादी सुबोध सुरेश जाधव वय २३ रा. हनुमानवाडी हे आपल्या नवीन लग्न झालेल्या मित्रास भेटण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोठा जमाव होता . त्यामध्ये एक जण मोठ मोठ्याने आरडाओरडा करत होता. त्यास समजून सांगत असताना त्या ठिकाणी असलेला राहुल राख हा म्हणाला कि तु या ठिकाणी दादागिरी करण्यास आला आहे का?
नंतर फिर्यादी हे आपल्या घरी निघून गेल्यानंतर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास दहा ते अकरा जण येऊन सुबोध सुरेश जाधव, शुभम पदमाकर घरकले, अतुल सुरेश जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण करुन जखमी केले.त्या ठिकाणी असलेल्या दुचाकी ची देखील नुकसान केली. दि. ७ सप्टेंबर रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादी वरुन अभिजित सुभाष राख, राहुल सुभाष राख, अशोक, किसन राख, अर्जुन किसन राख, निलेश अशोक पोटे सर्व राहणार हनुमानवाडी व इतर अनोळखी पाच ते सहा जण याचे विरुद्ध गुन्हा र. नं. ३६९/२०२४ बिएनएस चे कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(३), १९०,३५२,३५१,(२), ३५१(३), ३२४(४) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास स. फौ. रवींद्र लबडे हे करत आहेत.तर दुसऱ्या फिर्यादी मध्ये फिर्यादी सुभाष किसन राख यांची मुले , पुतण्या व एक शेजारी असे शरद भिमराव वाघ यास चक्कर आल्यामुळे त्यांचे घराचे पटांगणात बसले होते. त्या वेळी सुबोध सुरेश जाधव, सुरज सुधीर शेटे, अतुल सुरेश जाधव, रोहण वाघ असे त्यांचे गाडी क्रमांक एम एच १२एच एन २७२८ मध्ये बसुन आले. फिर्यादी चे मुले व त्यांचे मित्र यांना वरातीमध्ये येण्यासाठी आग्रह करु लागले. त्यास त्यांनी नकार दिला असता फिर्यादी चे मुले व पुतण्या यांना बांबूच्या काठीने मारहाण करत त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने तोडून नेली. तसेच त्यांचे शेजारी शरदशरद व गौरव यांना मारहाण करत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र नं. ३७०/२०२४ बिएनएस चे ११५(२), ११८(१), ३५२,३५१(२) (३), ११९,(१) , ३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.