नेवासा – सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून दीड वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही या गुन्हेगाराच्या सत्काराचे आयोजन जंगी स्वरुपात करण्यात आले होते. गावात सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना नेवासा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सत्कारानिमित्त गावात बॅनरबाजी करणारे समर्थक, आयोजक आणि ढोल – ताशा तसेच फटाके फोडणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले. जुनेद शेख असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारीपदी निवड झाल्यामुळे जुनेद मूळ गाव असलेल्या देवगावात (ता. नेवासा) सत्काराचे आयोजन रविवारी करण्यात आलेले होत. हद्दपार युवक गावात येताच ढोल – ताशांचा निनाद सुरू असतानाच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक साध्या गणवेशात देवगावात दाखल झाले. पोलिसांना पाहून सत्कारमूर्ती गुन्हेगार शेख धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करणारे शाहीद इनामदार, सोहेल शेख, सोनू शेख, बॅनर बनविणारा संदीप कोलते, ढोल-ताशा वाजवणारे सिताराम डाके, दादासाहेब उत्तम वाल्हेकर, सौरभ डाके व फटाके फोडणारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.