ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

गुन्हा

नेवासा : तालुक्यातील तामसवाडी येथे बेकायदा घातक धारदार शस्त्र (गुप्ती) बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकावर कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी शेखर विलास शिंदे (वय २३ वर्ष, रा. तामसवाडी ता. नेवासा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक संजय माने व राम वैद्य हे तामसवाडी भागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारांनी पोलिसांना माहिती दिली की, शेखर शिंदे हा गुप्तीसारखे धारदार घातक शास्त्र बाळगून आहे.

गुन्हा

माहितीवरून पोलिसांनी तातडीने दोन पंचांना बोलावून शेखर याची झडती घेतली असता त्याच्याकडे १६ इंच लांबीची गुप्ती मिळून आली. त्याबाबत त्याला विचारले असता, गुप्ती त्याचा मित्र ओंकार बाबासाहेब तांदळे (रा. खोजेवाडी, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) याने त्याच्याकडे ठेवण्यास दिली असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक संजय माने करीत आहेत.

ही कारवाई, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे, पोलीस नाईक संजय माने व पोलीस कॉन्स्टेबल राम वैद्य यांनी केली आहे. घातक व अवैध शस्त्र कोणी बाळगून असल्यास माहिती कळविण्याबाबत जाधव यांनी आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

newasa news online
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा