ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शवदाहीनी

नेवासा – नेवासकर नागरिकांच्या अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली अत्याधुनिक गैस संचलित शवदाहीनी कार्यान्वित करा अशा मागणीचे निवेदन भाजपा नेते मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी म्हात्रे मॅडम यांना देण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायतच्या माध्यमातून नेवासा शहरातील स्मशानभूमी मध्ये गॅस संचलीत शवदाहीनीचे काम लाखो रुपये खर्चून पुर्ण करण्यात आले आहे परंतु उद्घाटन अभावी सर्वसामान्य नेवासकरांसाठी ती उपलब्ध करण्यात आलेली नाही.

शवदाहीनी

त्यामुळे कुणाचाही मृत्यू झाल्यास पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात यासाठी लाकडाचा वापर होतो साधारणतः एका अंत्यसंस्कारासाठी किमान दोन झाडे कापावी लागतील एवढी लाकडे लागतात त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनेही शवदाहीनी कार्यान्वित होणे गरजेचे आहे शिवाय अनेक दिवसांपासून कार्यान्वित नसल्याने या शवदाहीनीचे महागडे साहित्य चोरी जात असून यामुळे नेवासकरांचे व नगरपंचायतचे नुकसान होत आहे तरी आपण वरील गोष्टींचा विचार करून नेवासा स्मशानभूमीतील आधुनिक शवदाहीनी त्वरित कार्यान्वित करावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रोहितजी पवार suji, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रीकांत बर्वे, राजेश कडु, किरण लष्करे, आदिनाथ पटारे, संदीप पारखे, स्वार्थीक भोसले, शिवसेनेचे बंडु शिंदे आदी उपस्थित होते.

newasa news online
शवदाहीनी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शवदाहीनी
शवदाहीनी
शवदाहीनी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शवदाहीनी