नेवासा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कपाशी, तूर, सोयाबीन इ. पिकांचा पिकविमा उतरवला होता, पावसाचा मोठा खंड पडल्याने आपला नेवासा तालुका दुष्काळाच्या ट्रिगर मध्ये बसलेला आहे तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्याच्याही अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु अद्याप एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच सोयाबीन या पिकांचे २५% अग्रीम रक्कम मिळाली आहे. परंतु उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही ही रक्कम मिळाल्यास आगामी हंगामामधे शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खते घेण्यासाठी मदत होणार आहे,
तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन पुढील १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम देण्यात यावी साठी दिनांक 14/06/2024 रोजी दिलेले निवेदन व तालुका कृषी कार्यालयासमोर रूपया उधळो आंदोलनाचा इशारा…संबधित कृषी अधिकारी व कंपनी अधिकारी यांनी जानिपुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे कृषी आधिकारी व कंपनी यांना जागेवरच आणण्यासाठी जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने नेवासा तालुका कृषी कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत घेऊन कृषी अधिकारी व कृषी मंत्री महाराष्ट्र यांचे दशक्रिया विधी(पीढ दान)आंदोलन करण्यात येईल व काही अनुचित प्रकार घडला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला संबंधित शासकीय यंत्रणा आणि त्या विभागातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे. या वेळी जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले पाटील,प्रदेश अध्यक्ष नरेंद्र नवथर,अक्षय बोधक,आप्पासाहेब आरगडे,राहुल कांगुणे,विजय खरात,संभाजी आरगडे व अनेक शेतकरी सहकारी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.