नेवासा – नेवासा येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका महसूल सहायकाचे तात्काळ निलंबन करावे या मागणीचे निवेदन युवा सेना जिल्हाप्रमुख ऍड.निरज नांगरे यांनी तहसीलदार यांना दिले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यालयातील आवक-जावक व रेकॉर्ड विभाग महसुल सहाय्यक हे कार्यालयात कामानिमित्त येणा-या गोरगरीब शेतकरी बांधवासोबत अरेरावीची भाषा वापरतात तसेच प्रत्येक कामासाठी पैशाची मागणी करतात व विशेष म्हणजे ते २४ तास दारुच्या नशेत असतात, व शासन निर्देशानुसार ड्युटीवर असताना दारु पिल्यास संबंधितांवर शास्ती गैरवर्तन या प्रमाणे कार्यवाही करुन संबंधितांच्या सर्व्हिस बुक वर नोंद घेऊन वेतन रोखण्यात येते.
या प्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही व्हावी तसेच चालु ड्युटीवर असताना दारुच्या दुकानात दारु पित असतानाचे गुगल लोकेशन वेळ, तारीख सर्व पुराव्यासह फोटो आमचेकडे ऊपलब्ध आहेत व त्यांचे ऑफीस रोज दुपारी २ ते ५ या दरम्यान बेकायदेशीर पणे बंद असते तसेच हे अनेक वर्षांपासून नेवासा येथेच कार्यरत आहे व ते नेवासा तालुक्यातील रहिवाशी असल्याने ते पदाचा गैरवापर करतात, यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणे गहाळ झालेली आहेत वरील सर्व बाबींचा विचार करून त्यांचे दप्तर तपासणी करून अचानक पणे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. तसेच येत्या आठ दिवसात यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर दि. १९/०९/२०२४ रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. व होणाऱ्या सर्व परीणामाची जबाबदारी आपल्यावर राहील.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.