नेवासा – येथील काँग्रेस चे युवा नेते कमलेश गायकवाड यांची जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली.
दि ११ रोजी बुधवारी संगमनेर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीत या निवडीचे पत्र काँग्रेस पक्षाचे नेते माजी.महसुल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग चे जिल्हा अध्यक्ष बंटी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गायकवाड यांनी वेळोवेळी पक्षाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे तसेचं राज्यात सूक्ष्म नियोजन करून पक्ष वाढीसाठी मोठी कामगीरी केली त्यामुळे हि निवड करण्यात आली आहे
गायकवाड यांच्या निवडी बद्दल माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे,जयश्रीताई थोरात, आ. सत्यजित तांबे, आ. शंकरराव गडाख, आ.लहू कानडे, यांनी अभिनंदन केले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.