ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

लंके

नेवासा – अ.नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांची छञपती संभाजीनगर येथील भद्रा मारुती देवस्थान येथे पेढेतुला करुन नवसपुर्ती कार्यक्रम करण्यात आला तसेच नागापूर (ता.नेवासा) येथील ग्रामस्थांच्यावतीने गुळतुला करुन खासदार लंके यांचा गांवच्यावतीने जाहिर सत्कार समारंभ करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नेवासा तालुका ठाकरे गटाचे शिवसेना संपर्कप्रमुख सुदाम कापसे यांनी अटीतटीच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके विजयी व्हावे म्हणून भद्रा मारुती चरणी नवस केलेला होता.

लंके

लंके विजयी झाल्यानंतर नुकताच नवसपुर्ती कार्यक्रम कापसे यांनी घडवून आणला व नागापूर गांवच्यावतीने खासदार लंके यांची गुळतुला करुन सत्कार केला, याप्रसंगी शिवसेना नेते रामदास गोल्हार,नागापुरच्या सरपंच सौ.सुजाता कापसे, वैशाली काळे,अॅड.कैलास कापसे,संदिप कापसे, सुरेश काळे,बन्सी कापसे,गोरख कापसे,रवि गव्हाणे,उदय शेळके,किरण नवले आदी उपस्थित होते.

लंके
लंके

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंके
लंके

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंके