नेवासा – नगर जिल्ह्याचे खासदार नीलेश लंके यांनी नेवासा तालुका मधील शेकडो हितचिंतक आणि समर्थक यांना आवर्जून भेट दिली. विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले. जनमानसातील नेता नेतृत्व करत असताना तळागळातील कार्यकर्त्यांची अस्थेवाईक चौकशी करताना ते दिसले. नेवासा तालुक्यातील नागापूर येथील जिवलग मित्र सुदाम कापसे यांचे घरी त्यांनी भेट दिली. यावेळी कापसे यांचे कुटुंबीय आणि गावकरी भारावून गेले होते. प्रवरा संगम येथील सरपंच राहुल लकारे यांचे बंधू यांची उच्च अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. हजारो लोकांची भेट घेऊन भद्रा मारुती दर्शन घेतले.
लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारा लोकनेता जनतेने याची देही याची डोळा बघितला नेवासा तालुक्यात शरदचंद्र पवार साहेब प्रणित राष्ट्रवादी तुतारी निनाद करण्यासाठी कार्यकर्ते यांना पाठबळ देण्यासाठी तन मन धनाने सोबत राहील. पक्ष वाढीबरोबर जीवा भावाच्या सर्व धर्मीय कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी कटिबध्द राहील असे ते यावेळी म्हणाले . या दौऱ्यावेळी शिवसेना नेते रामदास गोल्हार,रवी भाऊ गव्हाणे, सुदाम कापसे, गणेश झगरे, गणेश चौगुले यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.