नेवासा – आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आपल्या ध्येयावर मनापासून प्रेम केल्यास व मनापासून अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते. वेळेचा व ऊर्जेचा सदुपयोग करून आई वडिलांना अभिमान वाटेल असे यश मिळवावे. असे प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रा.देविदास साळुंके यांनी केले. ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे गणेश सांस्कृतिक उत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प प्रसिध्द व्याख्याते प्रा. देविदास साळुंके यांनी गुंफले. यावेळी ते बोलत होते.
प्रा.साळुंके पुढे म्हणाले की अपयश, अपमान याकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. चेहऱ्यावर आनंद, ऊर्जा व सकारात्मकता घेऊन जगा. नेहमी प्रयत्न करत रहा. हारतो तोच जो प्रयत्न करणे थांबवतो. विद्यार्थीदशेत प्रचंड अभ्यास करा. विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करा.
प्रा. साळुंके यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी समर्पक सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम वरील उदाहरणे देत मंत्रमुग्ध केले. त्यांनी क्रीडा व सामजिक क्षेत्रातील उदाहरणे देत भावी उज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायक उदाहरणे दिली. व्याख्यानाचा शेवट त्यांनी सुंदर गीताने केला. या प्रसंगी प्राचार्य बाळासाहेब पवार, पर्यवेक्षक अशोक मारकळी, सुनिल धस, राजेंद्र आदमाने, शरद व्यवहारे व इतर सहकारी इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.