नेवासा – सुपारी घेऊन शंतनू वाघ यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणा-या गुन्हेगारांना अटक करा अशी मागणी नेवासा येथील वाघ कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. सद्या संभाजीनगर येथे उपचार घेत असलेले शंतनू वाघ यांच्या वर हल्ला करणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा येथील सर्व सामाजिक संघटनांसह ग्रामस्थांनी नेवासा तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढला होता मात्र या घटनेला २७ दिवस उलटून गेले तरी ही पोलीस यंत्रणेकडून कोणतीही कार्यवाही पोलिसांनी केली नसल्याने वाघ कुटुंबियांनी लोणी येथे जाऊन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची दि.१२ सप्टेंबर रोजी भेट घेतली.
याबाबत दिलेल्या निवेदनात शंतनू वाघ यांचे वडील पोपट वाघ यांनी म्हटले आहे की माझा मुलगा शंतनू वाघ हा दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजे दरम्यान नेवासा फाटा ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोडने क्रेशरकडे जात असताना पांढ-या रंगाची बोलोरे जीपने नेवासा खुर्द येथील मार्केट कमिटी पासुन त्याचा पाठलाग करुन व तो मोटार सायकलवरुन जात असतांना त्यास घाडगे पाटील शिक्षण संस्थेचे समोर पाठी मागुन जोरदार धडक देवुन अपघाताचा बनाव करुन त्यास दुरपर्यत फरपटीत नेले व त्याला जखमी केले व त्यास जखमी अवस्थेत सोडुन देवुन सदर गाडी चालक व त्यातील व्यक्ती भरधाव वेगाने निघुन गेले.
सदर अपघाता पुर्वी शंतनु पोपटराव वाघ यास त्याचा पाठलाग होत असल्या बाबत त्याने त्याच्या मोबाईलवरुन त्याची बहीण श्रुती सौरभ पोखरकर हिला कळविले होते. सदर घटनेची फिर्याद नेवासा पोलीस स्टेशन येथे अज्ञान व्यक्ती विरुध्द दाखल केलेली असुन पोलीस अधिका-यानी शंतनु वाघ यास अपघात करुन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नेवासा पोलीस स्टेशनचे पीआय जाधव यांनी आरोपीही निष्पन्न आहे व आरोपीना दोन दिवसांत अटक करणार आहे असे सांगितले होते.
आरोपींना अटक होत नाही म्हणून नेवासा येथील ग्रामस्थ व व्यापारी यांनी दि.२६ ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चात आरोपीना अटक होत नाही त्यांना अटक करावी अशी मागणी केली होती.त्यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आरोपी हे निष्पन्न झाले असुन आम्ही दोन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत आरोपीना अटक करुन आणतो ” असे सांगितले. परंतु नेवासा पोलीस स्टेशनचे इनचार्ज हे तपासामध्ये दिरंगाई करत असल्याने दिसुन येत आहे.
सदर गुन्हयामुळे नेवासा शहारातील व परिसरातील ग्रामस्थ सदर घटनेमुळे भयभीत झालेले आहे असे प्रकार शहरात व परिसरात होणे अतिशय निदंनिय आहे सदर घटना होऊन आज जवळ जवळ २७ दिवस उलटुन ही आरोपीना अटक होत नाही व आरोपी हे मोकाट फिरत आहे.
जखमी शंतनु पोपटराव वाघ हा दिनांक १६/८/२०२४ रोजी पासुन छत्रपती संभाजीनगर येथील सिटीकेअर हॉस्पीटल मध्ये मृत्युशी झुंझ देत आहे व आज ही तो कोमात आहे त्याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद ही दिलेली आहे.पालकमंत्री ना.विखे पाटील यांन कार्यक्षम मंत्री या नात्याने आमचे पालकमंत्री आहात तरी सदर प्रकरणात आपण लक्ष घालावे व आम्हांला न्याय मिळवुन दयावा व नेवासा भयमुक्त करावे अशी मागणी निवेदनात पोपट वाघ यांनी केली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.