नेवासा – नेवासा येथील राजमुद्रा ग्रुपच्यावतीने आयाजित गणेशोत्सवामध्ये दरवर्षी होणाऱ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला फाटा देऊन स्वर्गरथ पंचक्रोशीत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राजमुद्रा ग्रुपचे मार्गदर्शक दादा निपुंगे यांचे अभिनंदन केले आहे.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा ग्रुपच्यावतीने नेहमी कार्यक्रम विधायक राबविले जातात. करोना काळात अनेक झालेल्या दिशाहीन लोकांना तो योग्य मार्ग दाखवण्याचे काम या ग्रुपच्या सहकाऱ्यांनी केले. या काळात प्रवासात असणाऱ्या अनेकांना
अन्न, पाण्याची व निवासाची व्यवस्था केली गेली. समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी राजमुद्रा ग्रुपच्या सहकाऱ्यांचा कायमच पुढाकार असतो.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा ग्रुपच्यावतीने दरवर्षी राजमुद्रा चौकात गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेतले जातात. मात्र, यावर्षी राजमुद्रा ग्रुपचे मार्गदर्शक दादा निपुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वानुमते विचार करून मनोरंजनात्मक व इतर विविध कार्यक्रमाला फाटा देऊन समाजासाठी अत्यंत आवश्यक व गरजेचा असलेला स्वर्ग रथ बनवून लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तो निर्णय ग्रुपच्यावतीने तात्काळ अंमलातही आणला गेला.
यापूर्वी गावात किंवा पंचक्रोशीत कोणाचे निधन झाल्यास स्मशानभूमीपर्यंत पायी शवयात्रा नेणे विविध कारणांमुळे अवघड होत असे. त्यासाठी स्वर्ग रथ अत्यंत गरजेचा होता. ही गरज ओळखून राजमुद्रा ग्रुपच्या वतीने सर्वांना मोफत स्वर्ग रथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा मुकिंदपूर, नेवासा फाटा परिसरासह पंचक्रोशीतील इतर गावांनाही लाभ मिळणार आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.