गणेशवाडी – पांढरी पुल येथे दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० ते सकाळी ८ वाजेपर्यंत तिन अपघात झाले आहे. या मध्ये चार जण जखमी झाले. रात्री अपघात झाल्याने सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. पहीला अपघात रात्री १२.३० वाजता टि. एन ५२ एच २०४६ चेन्नई येथून माल घेऊन गुजरात ला निघाली होती. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जवळील च एका नव्यानेच सुरू झाल्याने हार्डवेअर च्या दुकानात विस फुट आत मध्ये घुसला . त्यामध्ये त्यांचे सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले. दुसरा अपघात पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान एम एच १६ सिसि २६२७ क्रमांकांची ट्रक मुंबई माल भरुन अहमदनगर मार्गे संभाजी नगर कडे जात असताना घाटात ब्रेक नादुरुस्त झाले.
समोर चालू असलेले भाजीपाला घेऊन चाललेल्या टेम्पोला मागिल बाजुन धडक दिली.त्यातच पुढे तामिळनाडू येथील अपघातग्रस्त ट्रक दिसून न आल्याने त्यावरती जावुन आदळला. तिसरा अपघात सकाळी आठ वाजेच्या दरम्यान आर जे ११ जि बि. ८३३२ आद्रकन घेऊन संभाजी नगर कडे जात असताना समोरच अपघातग्रस्त वाहन दिसून न आल्याने त्यावरती जाऊन आदळले.या ठिकाणी दर आठ दिवसाला एक तरी अपघात होत असतो. वांजुळी,खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, उदरमल, आव्हाडवाडी,ईमामपुर ग्रामपंचायत यांचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास ठराव देणार आहे. या पुर्वी देखील अनेक वेळा संबंधित बांधकाम विभागास ठराव देवुन सुध्दा कुठल्याही प्रकारे कारवाई केली जात नाही. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाता मध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या ठिकाणी असलेले दादासाहेब बडे, प्रल्हाद भिसे, बाबाभाई शेख सरपंच खोसपुरी, अल्ताफ भाई शेख, बाळासाहेब काळे, संतोष शेठ बोरुडे, भिमराव आव्हाड चेअरमन खोसपुरी सोसायटी, अमोल भवार ,आदिनाथ काळे यांनी आम्ही प्रशासनास सात दिवसांचा कालावधी देणार आहोत. नंतर कुठल्याही प्रकारे पुर्व सुचना न देता आंदोलन छेडणार आहोत. घटनेची माहिती समजतास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे आपले सहकारी पो. काॅ. रवी गर्जे, पो. काॅ. रामदास तमनर,पो.कॉ, महेंद्र पवार, पो. हे. काॅ. दत्ता गावडे यांनी घटना स्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
परिसरातील ग्रामपंचायत च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास ठराव देवून त्यांना सात दिवसांचा कालावधी देण्यात येईल. नंतर कुठल्याही प्रकारे पूर्व सुचना न देता ग्रामस्थ रास्तारोको करून आंदोलन करणार
-सोमनाथ हारेर ,भाजपा नगरतालुका उपाध्यक्ष
पांढरी पुल येथे असलेल्या भेळीच्या दुकानासमोर च ग्राहक आपले वाहन ऊभे करत असतात. घाटातील वाहनांचा वेग जास्त असल्याने देखील अनेक वेळा अपघात झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे अतिक्रमण देखील हटविण्यात यावे अशी मागणी होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.