ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शनिशिंगणापूर

गणेशवाडी – शनिशिंगणापूर येथे सध्या लटकुंचा प्रादूर्भाव काही केल्या कमी होतांना दिसत नाही. यासाठी खुद्द पोलीस यंत्रणा च जबाबदार असल्याचे बोलले जाते. लटकु व पोलीस यांचेतील अतुट व घनिष्ठ नाते यासाठी जबाबदार आहे. या लटकु पायी कित्येक वेळा अपघात होऊन निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक वेळा तर कर्मचारी व लटकु यांचेतील झालेल्या हातापयी मध्ये तुंबळ हाणामाऱ्या झालेल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित पोलीस ठाण्याला यांचा बंदोबस्त करण्यासाठी गाव बंद ठेवत निवेदन दिले.

शनिशिंगणापूर

तरी देखील पोलीस व लटकु यांचेवर याचा काही फरक पडला नाही. या ठिकाणी पोलीस ठाण्यापासुन अगदी हाकेच्या अंतरावर बिंगो सारखे मटका यांनी आपले बस्तान बसवले आहेत.तरी सुद्धा पोलीसांना त्याचे काही सोयर सोतक नाही. हे असेच जर सुरू राहीले तर येथील व्यवसाय मोठा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व गोष्टीस फक्त पोलीस यंत्रणाच जबाबदार असणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस व उच्च दर्जाची पोस्ट असलेले पोलीस ठाणे देण्यात आले. परंतु या ठिकाणी लटकु च्या नादात भाविकांच्या सुरक्षेचा चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शनिशिंगणापूर

हि यंत्रणा लटकुंच्या सुरक्षिततेसाठी तर नसेल ना असा प्रश्न सध्या येणाऱ्या भाविकांना पडत आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारा पोलीस दादा मात्र बघ्याची भुमिका चांगली पार पाडताना दिसताच. या साठी त्यांचे तयार झालेले अतुट व घनिष्ठ नाते हे कारवाई साठी सध्या आडकाठी ठरत आहे.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनिशिंगणापूर
शनिशिंगणापूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनिशिंगणापूर