नेवासा – नेवासा येथील नगरसेवक राजेंद्र मापारी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने गोशाळेला चारा व नगर येथील स्नेहालयच्या अनाथ बालकांना खाऊचे तर वृद्धाश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करण्यात आले.युवा नेते स्वप्नील मापारी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
नेवासा शहरातील सामाजिक तसेच धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे नगरसेवक राजेंद्र मापारी यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या वर्षीही खडका फाटा येथील आनंद गोरक्षण गो शाळेत गोमतेला चारा व केळी खाऊ घालून त्यांचे पूजन करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
खडका नेवासा रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृध्दाश्रमात जाऊन वृध्दाना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी वृद्धांनी दीर्घायुष्य जीवनासाठी प्रार्थना करून जनसेवक असलेल्या राजेंद्र मापारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यानंतर नगर येथील स्नेहालय मधील अनाथ मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले.अशा विविध उपक्रमांनी नगरसेवक राजेंद्र मापारी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी आनंद गो रक्षण संस्थेचे निखिल शिंगवी,शरणपूर वृध्दाश्रमचे रावसाहेब मगर तसेच स्नेहालय संस्थेच्या सानप मॅडम यांनी आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.