नेवासा – त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान त्रिमुर्तीनगर येथे गुरुवार दिनांक 19/09/2019 रोजी जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे हस्ते करण्यात आले यावेळी जिल्ह्यातून आलेल्या खेळाडुंशी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी संवाद साधला ते बोलताना म्हणाले की खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो तसेच निर्णयक्षमता,सहानुभूती,शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो,हे मोलाचे विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनाही क्रिकेट खेळण्याचा व रायफल शूटींग चा मोह आवरता आला नाही ,यावेळी त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान चे सचिव मनिष घाडगे पाटील,उपाध्यक्षा चव्हाण-घाडगे पाटील, क्रिडा प्रमुख संजयसिंह चौहान,कबड्डीकोच अशोक पानकडे,प्राचार्य सचीन कर्डिले,गणेश लंघे युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरज नांगरे,छबुराव काळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात खेळाडु व क्रिडा प्रेमी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.