नेवासा – मा नामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या नेवासा येथील यशवंत स्टडी क्लब येथे आज यशवंत स्टडी क्लबचे गुणवंत विद्यार्थी सुदर्शन भांगे (जिल्हा न्यायालय) किरण धनगर (ठाणे शहर पोलीस) कैलास तनपुरे (जिल्हा परिषद अहदनगर) यांचा सत्कार समारंभ स्टडी क्लब येथे पार पडला, त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सोनल म्हात्रे मॅडम व सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी श्री महेश मापारी उपस्थितीत होते सत्कार समारंभ नंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी सवांद साधला.या वेळी स्टडी क्लब च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.आतापर्यंत यशवंत स्टडी क्लब चे 32 विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.